Wednesday, 12 October 2016
|| प्रहार ||
...चिंतन आणी मंथनाची गरज...
-----------------------------------------
आज संपूर्ण महाराष्ट्राला एका नावा कडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत ते नाव म्हणजे आदरणीय आमदार बच्चू भाऊ कडू...
सतत तीन वेळा अचलपुर विधानसभा क्षेत्रातून 'अपक्ष'म्हणून निवडून येणारा आमदार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो का...?
होय ते खरे असले तरी अपक्ष निवडून येणारे अनेक आमदार आहेतच मग बच्चू भाऊंच्याच नावाची चर्चा उभ्या महाराष्ट्रात का होत आहे..?
त्याचे उत्तर सरळ आहे
प्रस्थापितांविरुद्ध 'दंड' थोपटून
सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर 'बंड'करणारा आक्रमक वृत्तीचा,लढवैया बाण्याचा,अन्यायाचा प्रतिकार निधड्या छातीने करणारा,जुलमी,जाचक व्यवस्थेला वठणीवर आणणारा...
आक्रमक आमदार म्हणून बच्चू भाऊ नावाचे वादळ आज महाराष्ट्रात घोंगावत आहे...
केवळ आक्रमकता नाही तर बच्चू भाऊ कडू यांच्या 'अपंगां' साठी च्या कार्याने महाराष्ट्राचे समाजमन भारावले आहे...
२८८ संख्येच्या विधानसभा सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर
पोटतिडकीने बोलणारा, स्वामिनाथन आयोग लागू करा अशी मागणी करणारा...
आमदारांच्या वेतन वाढीस विरोध करणारा,अभिनव आंदोलनातून न्यायासाठी सतत झगडणारा आमदार म्हणून बच्चू भाऊंची ओळख केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पोहचली आहे...
आमदार कसा असावा याची चर्चा जर कुठे झालीच तर तो बच्चू भाऊ कडू यांच्या सारखा असावा
अशी भावना आता लोक बोलून दाखवायला लागलेत याचा अर्थ असा कि व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्याची हि सुरवात झाली आहे...
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ७०००० हजार गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळवून देणारा..
स्वतः ७५ वेळा रक्तदान करणारा...सामजिक बांधिलकी,संवेदना जपणारा
'आमचं नात,वेदनेशी'असे सांगणारा 'कर्मयोगी'आमदार म्हणून महाराष्ट्राला बच्चू भाऊ परिचित आहेत...
मुजोर अधिकारी,कर्मचाऱ्यांचे कान उपटणारा तर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने खंबीर उभा रहाणारा आमदार...
मेळघाटातल्या ३०० शिक्षकांना न्याय मिळवून देणारा अन औरंगाबादेत शिक्षकांवर लाठीहल्ला झाला तर सरकारचा निषेध नोंदविणारा पहिला आमदार...शिक्षकांवरील गुन्हे परत घ्या अशी मागणी करणारा आमदार सुद्धा महाराष्ट्राला कळला आहे..
मग आमदार बच्चू भाऊ कडू
यांच्या 'प्रहार'कडून सुद्धा सर्वसामान्य माणसाला मोठ्या अपेक्षा आहेत 'प्रहार'च्या माध्यमातून बच्चू भाऊंच्या विचाराने काम करणारी माणसं
लोकांना हवी आहेत...
लोकांना न्याय हवा आहे..
लढणारे कार्यकर्ते हवे आहेत..
अशात आता 'प्रहार'चे काम राज्य व्यापी होत आहे...
जिल्ह्या जिल्ह्यात शाखा होत आहेत,बच्चू भाऊं च्या विचाराने प्रेरित होऊन काम उभं होत आहे...
अमरावती पदवीधर मतदार संघातून डॉ.प्रा. दीपक धोटे सर यांच्या सारख्या मनमिळाऊ,अभ्यासू,जाणकार,तज्ञ उमेदवारास निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्या गेले आहे...
हि पहिली लढाई आहे
जी विचार आणी मुद्द्यावर 'प्रहार'लढत आहे...आणी यातून सामाजिक विचार आणी राजकीय अस्तित्व पुढे जाणार आहे....
मित्रांनो याच दरम्यान आता अनेक
जिल्ह्यात 'जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या',नगर पालिका,परिषदेच्या निवडणुका सुद्धा होत आहेत...
अशा वेळी 'प्रहार'ने ह्या निवडणुका लढाव्यात असा आग्रह
कार्यकर्त्यांचा असणे साहजिक आहे ,पण जिथे संघटनात्मक बांधणीचे काम पूर्ण व्हायचे आहे..
त्या ठिकाणी निवडणुका लढण्याचा प्रयोग यशश्वी होईलच असा नाही...
तरीही राजकीय अस्तित्वा साठी निवडणुका लढाव्या लागल्या तर
कुठे तडजोड करावी की काय हा प्रश्न साहजिक निर्माण होईल
अशा वेळी तत्वांशी अजिबात तडजोड न करणाऱ्या आमच्या नेतृत्वाचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागणार आहे...
निवडणुका लढू..
जिंकू किंवा पडू...पण त्या नंतर
पुन्हा त्याच आक्रमकतेने उभे राहून सामान्य माणसाच्या प्रश्नावर
लढणार की नाही हा खरा मुद्दा आहे आणी यावर चिंतन आणी मंथन झाले पाहिजे....
निवडणुका येतील आणी जातील
पण व्यवस्था परिवर्तनाचा लढा
आमदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वात
महाराष्ट्र व्यापी उभारायचा हाच एक दृढ संकल्प व प्रतिज्ञा या वेळी केली पाहिजे असे माझे मत आहे...जय हिंद,जय प्रहार..!

Saturday, 1 October 2016
Subscribe to:
Comments (Atom)