Tuesday, 20 September 2016

प्रहार परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

जय जवान !!! शहीद जवानांना माझे त्रिवार वंदन!!!  
हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि त्यांची देशसेवा नेहमीच लक्षात राहील. उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी देशाला आश्‍वासन देतो की, या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पण तय्यार मी आहोत.

आदरणीय मोदीजी , आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी युनाइटेड नेशन मध्ये जाऊन प्रयत्न करा आणि सर्व शांतता प्रिय राष्ट्राची परवानगी घेऊन पाकिस्तानवर लष्करी कारवाई करा हि नम्र विनंती, तुम्हाला action घेण्यासाठी निवडून दिले आहे acting करण्यासाठी नाही .अणुबॉम्ब ची भीती जशी आपल्याला आहे तशी त्यांनाही आहे...अणुबॉम्ब चा वापर करायचाच झाला तर पाकिस्तानचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपेल हे त्यांनाही माहित आहे...एवढ्या सहजासहजी कोणी स्वतःचे अस्तित्व नष्ट करायला तयार होत नाही...ह्या अशाच बोटचेप्या धोरणामुळे पाकिस्तानचे फावले आहे.अरे बोलायला सोप आहे कि पाकिस्तानमध्ये घुसन मारा , परंतु हे विसरू नका पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि ते माथेफिरू राष्ट्र ते वापरू शकते , त्यांनी वापरल्यानंतर आपणही वापरू परंतु लाखो भारतीय मारतील , तयारी आहे का तुमची सांगा , युद्ध सुरु झाले कि प्रचंड प्रमाणात महागाई वाढेल नंतर ओरडू नका ,मोशे डायान नावाच्या इस्राएलच्या परराष्ट्र मंत्र्याने 1978 साली मोरारजी देसाईंची भेट घेऊन सांगितले होते कि तुम्ही फक्त तुमच्या विमानतळावर आमच्या विमानांना इंधन भरू द्या मग आम्ही पाकिस्तानची अणुभट्टी उद्धवस्त करतो परंतु मोरारजींने हा प्रस्ताव फेटाळला कारण त्यांना मुस्लिम मते पाहिजे होती जर मोरार्जीने मोशे डायान ह्यांचे ऐकले असते तर Pakistan कडे एकही अणुबॉम्ब नसला असता आणि अणुबॉम्बची भीती दाखवून भारतात अतिरेकी घुसवाले नसते पण आता काय उपयोग ? आता हे खूप अवघड झाले आहे,आपण निषेध करण्या शिवाय कांही करीत नाही. देश डिफेंस साठी सकळ उत्पन्नाच्या 17 टक्के खर्च करतो, जो खर्च अनुत्पादित ठरतो. शिवाय डिफेन्सला सर्व माल टॅक्स फ्री, स्वस्त दारूसह पुष्कळ सुविधा. पण अधिकारी मात्र नको त्या भानगडीत गुंतलेले कितीतरी वेळा जगजाहीर झालेले आहे. बोफोर्स पासून डिफेन्स हा एक सर्वात मोठा भ्रस्टाचाराचा अड्डा झालेला आहे. माझे काम मी योग्य प्रकारे केले नाही तर ती योग्यता ठरत नाही. चार अतिरेकी लष्करी तालावर घुसतात आणि 20 सैनिकांना मारून 20 एक सैनिकांना जखमी करतात. हे कशाचे लक्षण आहे?,,जेव्हां संसदेवर हल्ला झाला तेव्हाच काही केले नाही तर आता काय करू शकणार आपण. फक्त निषेध व्यक्त करू शकतो. जवानांचे जीव स्वस्त झाले आहेत का हो मोदी साहेब? त्या जवानांबरोबर त्यांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या तरुण बायका विधवा झालेत, त्यांच्या आई वडिलांचा आधार गेला हो मोदीजी. खरंच खूप वाईट वाटते कि काय त्यांच्या कुटुंबावर कसा दिवस आला हो मोदी साहेब. साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली आणि देव त्यांच्या कुटुंबियांना हिम्मत देवो हीच ईश्वर चरणी इच्छा. ज्यांचे जाते त्यांनाच कळते कि आपल्या समोर आपल्या हातांनी आपल्या लाडक्या लेकाच्या चितेला आग देतांना कसं वाटतं. ह्याच्या सारखे दुर्देव काय आहे हो. खरंच खूप चीड येते आहे कि आपण काहीच करत नाही.




प्रहार परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली



*इतिहास साक्षी आहे की संताची भूमि असलेल्या महाराष्ट्र मधे अनेक थोर पुरुष महात्मे जन्मला आले.त्यांनी समाजा साठी बलिदान त्याग केला व महाराष्ट्र मधे क्रांती घडवून आणली.तशीच ऐक क्रांती अपंग बांधवान साठी घडवून आननारे आमदार श्री बच्चू भाऊ कडू यांनी 2011 साली प्रहार अपंग क्रांती आंदोलन या नावाने अपंग बांधवान साठी संघटना तयार केली. आजपर्यंत अनेक आंदोलन करूँन बच्चू भाऊ नि 21 शासन निर्णय काढण्यासाठी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला भाग पाडले.ही किमया करा साठी बच्चू भाऊ ला 20 - 30 वर्ष नाही त फक्त 3 वर्ष लागले.आणि अपंग बांधवानच्या जीवनात जशी नव संजीवनी भरण्याचेच काम आमदार बच्चू भाऊ नि केले अपंगाच्या 3%निधी साठी बच्चू भाऊ ने सम्पूर्ण राज्यभर आंदोलन करूँन अपंगाचा हक्क त्यांना मिळवून दिला. अनेक योजना सरकार नि काढल्या होत्या पंन शासना च्या बोगस कारभारामुळे ते ज्याला 2 हात नहि डोळे नही पाय नाही अश्या अपंग बांधवापर्यंत ते पोहचत नव्हत्या पंन आमदार बच्चू भाऊ च्या आगळ्यावेगळ्या आंदोलना मुळे अपंगा पर्यत पोहचू लागल्या. अपंगाच्या घरकुल योजने साठी बच्चू भाऊ विधानसभेत सतत आवाज उठवित होते.2015 साली नागपूर अधिवेशन मधे सरकार ला बच्चू भाऊ ची मागणी मान्य करावी लागली. व अपंगाला त्यांच्या हक्का चे घर मिळू लागले.आमदार बच्चू कडू तसे अचलपुर मतदारसंघा चे आमदार ते सलग 3 वेळा अचलपुर मतदारसंघातून अपक्ष निवडून येत आहे.पंन त्यांच्या मुळे राज्यभरातील अपंग बांधवांना त्यांचा हक्क मिळाला.आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्ना मुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परीषद व पंचायत समिती मार्फत बऱ्याच योजना अपंग बांधवान साठी राबविल्या जात आहे हे बच्चू भाऊ च्या कष्टाचेच फळ.21 महत्वपूर्ण शासन निर्णय काढून आमदार बच्चू कडू ने अपंग बांधवाच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे.हे मात्र खरे.*
(आले शंभर गेले शंभर बच्चू भाऊ एकच नंबर )




Saturday, 17 September 2016

AllRounder in terms of Social Work

     

    







Bhau Act As  Many Role Like :-


  • Corporate Social Worker
    Works with employees whose personal issues, substance use or problems with coworkers may be causing trouble on the job.
  • School Social Worker
    School social workers specialize in helping students with school-related issues and personal problems that affect their lives at school and at home. Working at one or more schools, these social workers mediate between community resources and students who need special services.
  • Gerontology Social Worker
    Gerontology social workers provide services for elderly people and advise these individuals about housing, transportation, meal delivery and long-term care. The social workers also coordinate client services and may facilitate support groups for family caregivers.
  • Clinical Social Worker
    Clinical social workers offer counseling or psychotherapy services in clinics, public agencies, medical facilities and private practices. 
  • Child and Family Social Workers
    These are social workers provide information about resources for children and families, coordinate services and facilitate contact with local and state agencies and community organizations. They also perform supportive casework with parents and offer advice about positive parenting skills.
  • Child and family social workers protect vulnerable or at-risk children and aid families who need help finding or applying for services, such as childcare, food stamps and other benefits. They step in when children are in danger of neglect or abuse, arrange for foster care homes for children, work to reunite families and help evaluate and place adoptions.
  • Clinical Social Workers
    Some social workers are licensed to provide therapy for children and families coping with life changes, such as divorce, death or other serious family problems.
  • Medical and Public Health Social Workers
    Medical social workers help people who have serious or chronic health problems. They advise individuals and families about methods to deal with being ill. They also find services, such as nursing care, nutrition classes and therapies that are available to help sick individuals and their families. 
Image may contain: 1 person
Bacchu Bhau in front of Matralaya


बच्चू कडू .... जगावेगळा आमदार....
ओमप्रकाश कडू उर्फ बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत आमदार म्हटल्यावर कडक इस्त्रीचे पांढरे कपडे, बोटात अंगठ्या, फिरायला मोठ्या गाड्या असं चित्रं उभं राहतं. पण बच्चू कडूंकडे असं काहीच नाही. ते प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, यां माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत.
बच्चू कडू त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत . पत्रं पाठवून निदर्शनं करून किंवा उपोषणं करून प्रश्नाकडे लक्ष वेधलं जात नाही हे लक्षात आल्यावर अभिनव आंदोलनं सुरू केली. कधी सगळे केस भादरून घेतले. कधी जमिनीत स्वतःला गाडून घेतलं. कधी कांद्याचा वर्षाव केला. कधी तहसील कार्यालयाला टाळं मारून कर्मचा-यांना कोंडलं. आश्वासनं न पाळणा-या मंत्र्यांच्या गाडयांवर काळ्या रंगाचे पट्टे मारले. कधी ऑफिसांमधे साप सोडले. शाळेत न शिकवता खासगी क्लासेसमधेच शिकवणा-या शिक्षकांच्या कानाला धरून ओढणारं च्याऊ माऊ आंदोलन ही कल्पकतेची कमाल होती. पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा इशारा देणारं शोले आंदोलन तर खूपच गाजलं.. अंगात शर्ट न घालता विधानसभेच्या सभागृहात जाऊन लक्ष वेधून घेतलं. संडास बनवण्यात भ्रष्टाचार झाला होता. त्यासाठी सरकारच्या पंचायत राज समितीला सडलेले संडासाचा पॉट देण्यात मागंपुढं पाहिलं नाही. राहुल गांधी विदर्भात येऊन कलावतीला घर बांधून देतात. म्हणून थेट अमेठीत जाऊन तिथल्या एका गरजू बाईला घर बांधून दिले.
सरकारी अधिकारी आपल्या खुर्चीवर कधीच नसतात, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव. मग बच्चूभाऊनी त्यांचा रिकाम्या खुर्च्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. वर लिलाव करून मिळालेला पैसा सरकारी खजिन्यातही जमा केला, सरकारी अधिका-यांचे धाबे दणाणले. जेवायला जातानाही अधिकारी कधी येणार याचे निरोप शेजारच्या खुर्चीवाल्याकडे द्यायला लागले.
आमदारांना गाडीसाठी बिनव्याजी कर्ज मिळतं. त्यांनी गाडी घेतली. विकली आणि त्यातून अम्ब्युलन्स घेतली ,रुग्णांची सेवा सुरू केली. बच्चू आणि त्याचे मित्र अडल्यानडल्याला मुंबईला घेऊन जाण्याची सगळी जबाबदारी घेतात . मोतिबिंदू पासून ब्रेन ट्युमरपर्यंत ऑपरेशन झाली. केईएम, जेजे, सेंट जॉर्ज, कामा, नायर अशी हॉस्पिटल दुसरं घरच बनली. कधी हिंदुजासारखे खासगी हॉस्पिटलवाले नडू लागले तर आंदोलनही केली. प्रहार आरोग्य समिती उभी राहिली. फक्त रुग्णांसाठीच नाही तर मुंबईत आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही आधार दिला. नायरमधे तर आज नातेवाईकांसाठी शिध्याचीही व्यवस्था करून द्यायला सुरुवात झालीय. आजवर छोटी मोठी अशी चार हजार ऑपरेशन बच्चू कडूंच्या प्रयत्नांनी झालीत.
बहिरम हे विदर्भातलं एक मोठं तीर्थक्षेत्रं. येथील यात्रा वर्षानुवर्षं ओळखली जायची ती तमाशांमुळं. इथले तंबू वेश्याव्यवसायाचे अड्डेच बनले होते. अशा नादांना लागून अनेक घरादारांची राखरांगोळी झाली. आमदार बच्चू कडूंनी याविरुद्ध दंड थोपटले.आपली सगळी ताकद पणाला लावत कडूंच्या प्रहार संघटनेने इथल्या तमाशाच्या राहुट्या बंद करायला लावल्या.
आता गेले काही वर्षं बहिरम यात्रेत प्रहार बहिरम यात्रा महोत्सव साजरा होतो.
आजही लावणी तिथे साजरी होते. राज्यभरातून नावाजलेले कलावंत आपली कला सादर करतात. तिथे आता बचतगटाच्या महिलांची प्रशिक्षण शिबिरं होतात. शेती आणि पशुपालनासाठी मार्गदर्शन होतं. कधी तिथे शहिद भगतसिंहांचे नातेवाईक तर कधी महात्मा गांधीचं पणतू तुषार गांधी येऊन तरुणांना मार्गदर्शन करतात. तिथे कुस्तीचे फड रंगतात आणि कीर्तनातून समाजप्रबोधनही होतं.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिथे मोठ्या रॅली आयोजित केल्या जातात.
शासकीय यात्रासारखा अभिनव उपक्रमही तिथे आता यशस्वी होतो. तालुकापातळीवरचे सगळे महत्त्वाचे अधिकारी या यात्रेत काही दिवस हजर राहतात. वीस पंचवीस ट्रक भरून सगळी कागदपत्रं एकत्र होतात. गोरगरिबांच्या गा-हाण्यांवर लगेच कारवाई केली जाते. वर्षानुवर्षं रखडलेली गोरगरिबांची कामं अर्ध्या तासात पूर्ण होतात. एकाच ठिकाणी चौदा खात्यांमधली सात हजार कामं संपवण्याचा विक्रम इथे घडलाय. शेकडो वर्षं चाललेल्या अशा एखाद्या परंपरेला नवं वळण लावणं सोपं काम नाही.
लग्न केलं तेही गांधी जयंतीच्या मुहूर्तावर. होणारा खर्च टाळून दोन हजार अपंगांना मदत केली. गळ्यात हार घातले नाहीत, तर तिरंगा झेंडा एकमेकांना दिला. मंत्र मंगलाष्टक गायली गेली नाहीत. तर वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या सुरावटीत लग्न लागलं.
विधानसभेतही अनेकदा चांगली भाषणं केली. विदर्भातले अनेक दुर्लक्षित विषय चव्हाट्यावर आणले. नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात, असं थेट विधानसभेत सांगून सगळ्यांना अचंबित केलं. पण यांचा आवाज सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत फारसा कधी पोहोचल

सर्व सामान्य आमदार आणि सर्व सामान्य कार्यकर्ता चि दहीहंडी कुनी सिने तारका नव्हता येथे कुनी नैटकी बाज नव्हताच येथे होता सर्वसाधारण मानुस





                            Writer of This Blog : Nitin Damle (Prahar IT Cell)

Thursday, 15 September 2016

अपंगाच्या 3%निधी आणि घरकुल विषयी.आधीवासी व शेतमजूर च्या समस्या विषयी नागपूर अधिवेशन 2015 ला सभागृहात बोलताना आमदार बच्चू कडू.
https://www.facebook.com/100009432528900/videos/1696464864011248/

Prahar IT Cell introducing 1001 services to the peoples

Prahar IT Cell.


*अन् पुन्हा मंत्रालय थरारले...*
आ. बच्चू कडू ने दिले अपंग शिक्षक दाम्पत्याने दिले जीवनदान
वेतन नसल्याने मुख्यमंत्री च्या दालनासमोर करणार होते आत्मदहन.
स्वतः दोन्ही डोळ्याने अंध.पत्नी ऐका डोळ्यांनी दिसत नाहि संसाराचा गाढ़ा ओढाता-ओढाता नाकी नऊ आले असताना शासनाच्या एकूणच व्यवस्थेने पिढीत असलेल्या त्यां कुटुंबाला पुन्हा जगण्याच्या शर्थतुन बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.हा मनस्ताप नव्हे तर आता जगाव तरी कसं.या विचारचक्रात अडकलेल्या शाररिक तथा व्यवस्थेने अपंग केलेल्या दाम्पत्याने चक्क मुख्यमंत्राच्या दालनासमोर कुटुंबा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र राज्यभरात अनाथांचा नाथ म्हणून पुढे आलेल्या आ.बच्चू कडूनी त्यां पिढीत कुटुंबाला जीवनदान दिले.
संत गाडगेबाबाच्या एकूणच विचारधारेने प्रेरीतच नव्हे झपाटलेल्या
आ.बच्चू कडू यांची नजर सर्वसामान्य च्या दुखावर खिळली आहे.आ.बच्चू कडू कुठे ही असो त्यांना समाजव्यवस्था तसेच प्रशासकीय व्यवस्थेने पिढीताचे दुःख आपसूकच दिसते.असाच ऐक प्रसंग दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी दुपारी 3 वा.दरम्यान मंत्रालया मधे अनेकांनी अनुभवला.यावेळी अख्य मंत्रालय आ.बच्चू कडू भावनिक आव्हाना समोर थरारुंन गेले.
प्रकाश नामदेव जाधव अस त्या दोन्ही डोळ्याने अंध असलेल्या शिक्षकाच नाव आहे.14 जून 2001 रोजी केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक विभाग सोलापूर येथे ते कार्यरत आहे.सन 2013 पासून त्यांची नियुक्ति आहे.सर्वगूण सम्पन्न मात्र नशीबी आलेले दुर्दैवाने अपंगात्वावर मात करूँन ते शिक्षक पदावर नौकरी करतात.पत्नी.दोन जुळ्या मुली आणि ऐक मुलगा असा संसार असताना शासनाच्या जाचक अटींच नव्हे तर मंत्रालयातील खाबूगिरी ने त्याला त्रस्त केले.जेव्हा पासून नियुक्ति झाली तेव्हापासून प्रकाश जाधव यांना वेतंनच नाहि.काय कराव.कसे कराव वेतन नाहि म्हणून संसाराच्या गाढ़ा ओढच कसा अशा ऐक नव्हे तर अनेक प्रश्नाच्या विचार चक्रात अडकलेल्या प्रकाश जाधव यांनी शेवटी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला.तोही स्वतःच्या घरी नव्हे तर ज्या शासन व्यवस्थेने त्याला त्रस्त केले त्याच्य़ा दालनासमोर..हा प्रसंग खळबळजनक तेवढाच संतापजनक आणि भावनीक सुध्दा होता.
तेव्हा अचानक आ.कडूचा आवाज अपंग जाधव कुटुंबीयाच्या कानावर पडला आणि त्यांनी क्षणात आपला निर्णय बदलवत आ.कडू यांच्यावर सम्पूर्ण विश्वास दाखविले.आ.बच्चू कडू यांनी लागलीच आपल्यातील मानवतेचा परीचय करूँन देत त्यां दाम्पत्याला वित्त आयोगाचे सचिव जैन यांच्याकडे घेऊन जात "आता न्याय देता की..?" असा त्वेषाने प्रश्ण करताच सचीव जैन यांनी लगेच जाधव यांच्या प्रलंबीत फाईलची शाहनी शा करूँन ते प्रकरण मार्गी लावले आ.बच्चू कडूच्या आजच्या या रौद्रवताराने राज्यभरातील अपंग विदयालय च्या हजारो कर्मचार्याना न्याय मिळाला आहे.
*मोठा अनर्थ टळला*
*प्रकाश जाधव हे मुख्यमंत्राच्या दालनासमोर आत्महत्या करण्याच्या दूरद्रुष्टीकोनातूंन पूर्ण तयारीने आज दी 30 ऑगस्ट मंगलवार रोजी मंत्राल्यात आले होते.त्यांनी गोपनीय पध्दतीने तशी व्यवस्था केली होती.मात्र अपंग कुटुंब मुख्यमंत्रीच्या दालनासमोर बसलेले दिसल्याने आ.बच्चू कडूनी त्यांची आस्थेने विचारपूस केली.आणि त्यांनंतर मात्र मोठा अनर्थ टळला**तीन वर्षापासून प्रलबीत प्रश्ण तासभरात सुटला*
प्रकाश जाधव हे वेतन मागणीचा प्रश्न घेऊन सन 2013 पासुन प्रशासन तथा शासन दुप्तरी येरझरा मारुन थकला होता.मात्र 30 ऑगस्ट चा तो दिवस त्यांच्यासाठी निर्णायक ठरला आ.बच्चू कडू नी जाधव कुटुंबियाला वित्तसचीव जैन यांच्याकडे घेऊन जातं यांनी प्रकाश जाधव यांच्या फाईलवर स्वाक्षरी केली.त्यामुळे त्यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यांच्यासोबत त्यांचे एकूण 55 सहकारी कर्मच्यार्याना वेतन मिळणार आहे.
*तर माझे ही अवयव घ्या*
*अपंग जाधव ने मारली प्रशासनाच्य श्रीमुखात
दि 30 ऑगस्ट मंत्रालय मधे मुख्यमंत्रीच्या उपस्थितील अवयव दान कार्यक्रमचा शूभारभ होता.तेव्हा अपंग प्रकाश जाधव यांनी थेट मंचावर जाऊन " माझे जीवन शासन तथा प्रशासन नीरर्थक केले त्या मुळे माझे अवयव घेऊन टाकावे असे आव्हान मंचावरन केल्याने कार्यक्रमा मधे चांगलेच खळबळ उडाली*

Tembha Andolan Aggressive Bhau for Farmer demand


*आता पेरणी ते कापनीची कामे रोजगार हमी योजनेतून होणार*
*अमरावती जिल्हाची प्रायोगीक तत्वावर निवड *
*आमदार बच्चू कडू च्या प्रयत्नाना यश*
दिनांक 30-8-2016
जगाचा पोशिदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिति हातघाईस झाली आहे.पोशिदा असणार बळीराजा आज स्वतः जीवन संपवित असताना ही व्यवस्था कुठेतरी बदलावी म्हणून आ.बच्चू कडू यांनी गेल्या कित्येक वर्षापासून सरकारकडे पेरनि ते कापनि पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतुन करण्याची मागणी लाऊन धरली होती.त्याला कहीसे यश प्राप्त होत असल्याचे दिसून येत असून राज्याचे सचीव डॉ भापकर यांनी त्या साठी अमरावती जिल्हा ची प्रायोगीक तत्वावर निवड केली.बेरोजगार च्या हाताला काम मिळावे.त्यातून सर्वान च्या घरातील चुली पेटाव्या या उदात्त्त द्रुष्टीकोनातून केंद्र शासना मार्फत देशभरात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविन्यात येते.या योजने साठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात मात्र प्रत्येक्षात ठोस कामे होताना दिसत नाही ग्रामीण भागातील रस्ते बाँधकाम बंदारे रुक्ष लागवडी आदिसह छोटी मोठी कामे या योजनेतून होतात,परंतु या महत्वपूर्ण योजनेचा लाभ उबधाईस आलेल्या शेतकर्या साठी व्हावा अशी मागणी आ.बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षापासून लाऊन धरली होती.त्यासाठी कित्येक आंदोलन सुध्दा केली.
तेंव्हा त्यांची ती मागणी ग्राह्य धरत रोजगार हमी योजनेचे राज्यचे सचीव डॉ.पुरुषत्तम भापकर यांनी आ.कडू सोबत बैठक घेऊन त्याचा आराखडा तयार केली.ज्यामधे पेरणी ते कापनी पर्यतची कामे प्रत्येक्षात रोजगार हमी योजनेतून कशी करावी यांचे नियोजन केले.आणि हा प्रयोग अमरावती जिल्हातून सुरू करणार असल्याचा विश्वास सचिव डॉ.भापकर यांनी दिला.
परिणामी शेतकऱ्यांची शेतीतील कामे आता सरकारी खर्चावर होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल आहे.





Tembha Andolan